आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राच्या विकासाकरिता आमदार कोरोटेंच्या प्रयत्नाला यश

0
30

राज्याच्या अर्थसंकल्पिय बजेट मध्ये ३५ कोटी ५४ लाखांच्या विकास कामाची तरतूद

देवरी, ता.१२: आमगाव- देवरी विधानसभा क्षेत्रात मोडणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व रस्ते आणि पूलांचे मजबुतीकरणासह डांबरीकरण कामासाठी एकूण ३५ कोटी ५४ लाख रुपयांच्या विकास निधीची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पीय बजेट मध्ये करण्यात आली आहे. आमदार सहसराम कोरोटे यांनी क्षेत्राच्या विकासाचा प्रश्न शासन दरबारी कायम रेटून धरल्याने अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जात आहे.
देवरी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ पासून भर्रेगाव -राजमडोंगरी- परसोडी-ककोडी या मार्गामधील लहान पुलाचे बांधकाम करणे ७ कोटी ६० लाख, राष्ट्रीय महामार्ग क्रं ५३ ते मरामजोब-मासुलकसा-म्हैसूली-सिंगनडोह-रोपा-पालांदूर/जमी.-मगरडोह- घोगरा या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणसाठी ४ कोटी ७० लाख, चिरचाडी- रेंगेपार- दल्ली- शेंडा- पुतळी- आमगाव(आदर्श)- पिंडकेपार ,बोरगावं या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी ३ कोटी २० लाख, तुंबडीमेंढा-करूझरी मार्गाचे खडीकरणासाठी ८८ लाख, चिरचाडी-रेंगेपार-दल्ली-शेंडा-पुतळी-आमगाव(आदर्श)- पिंडकेपार-बोरगाव रस्त्यावरील मोरीचे बांधकाम  ५ लाख, पालांदूर ते मरारटोला रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरण ३० लाख, आमगावं/ खु.- तिरखेडी- पुराडा- फुक्कीमेटा- शिलापूर या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण ४० लाख, चिरचाडी- रेंगेपार- दल्ली- शेंडा- पुतळी- आमगावं(आदर्श)- पिडकेपार-बोरगाव रस्त्यावर पिडकेपार येथे सिमेंट रस्ता बांधकाम ३५ लाख, आमगावं(आदर्श)येथे सिमेंट रस्ता बांधकाम ८० लाख, राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ ते मरामजोब- मासुलकसा- म्हैसूली- सिंगनडोह- रोपा- पालांदुर- मगरडोह- घोगरा या रस्त्यावरील मासुलकसा येथे सिमेंट रास्ता बांधकाम करणे २० लाख आणि घोगरा रस्त्यावर मजबुतीकरण व डांबरीकरणाठी १ कोटी ३० लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
आमगावं तालुक्यातील रावनवाडी- बिरसी- कामठा- आमगांव रोड बांधकाम २ कोटी, नवरगावकला- करंजी मोहगाव- सुपलीपार-डोंगरगाव-कट्टीपार रोड बांधकाम- २ कोटी ५०लाख, दतोरा-इर्री-मोहगाव-सुपलीपार टोला-कालीमाटी नंगपूरा रोड बांधकाम-५ कोटी, रावणवाडी-बिर्सी-कामठा-कालीमाटी-आमगांव (कामठा चौक)-रोड बांधकामकरीता ३६ लाख २५ हजाराच्या  निधीची तरतूद करण्यात आली आहे.
सालेकसा तालुक्यातील मानागड-मरकाखांदा- लोहारा रस्त्यावर मोरी व संरक्षक भिंतीचे काम १० लाख, को्पालगड- पथराटोला रस्त्यावर मोरी व संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे-१० लाख, कोपालगड- पथराटोला या रस्त्यावरील पोच मार्गाचे रुंदीकरणासह मजबुतीकरण करणे-६० लाख, निंबा- बाकलसर्रा- जांभळी या रस्त्याच्या रुंदीकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १ कोटी २० लाख, आमगाव/खु.-तिरखेडी-पुराडा-फुक्किमेटा-शिलापूर रस्ता मकरधोकडा गावात सिमेंट रस्ता बांधकाम करणे २० लाख रुपये, कोपालगड- पाथरटोला या पोचमार्गाचे डांबरीकरण करणे ६० लाख रुपये. पुराडा-फुक्कीमेटा या रस्त्यावर डांबरीकरण करणे ६० लाख रुपये. मानागड-मरकारखांदा-लोहारा यामार्गावरील रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ३० लाख रुपये. आमगांव-सालेकसा-दर्रेकसा ते टेम्भूटोला या मार्गाच्या रस्त्याचे मजबुतीकरण करणे ९० लाख, तिरखेडी ते केहरिटोला या रस्त्यावर डांबरीकरण व मजबुतीकरण करणे ५० लाख, केहरिटोला-म्हशीटोला-लोहारा या रस्त्यावरील मार्गाचे डांबरीकरण व मजबुतीकरण करणे ५० लाख, हलबिटोला तालुका सालेकसा येथील धान्य गोडावून व विश्राम गृहाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रेटिकरण करणे १० लक्ष रुपये. मुरूम टोला- निंबा- बाकालसर्रा- जांभळी या मार्गावर काँक्रेटिकरण करणे २० लाख रुपये असे एकूण ३५ कोटी ५४ लक्ष रूपयाच्या निधीचे तरतूद या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या प्रयत्नाने राज्याच्या अर्थसंकल्पीय बजेट मध्ये तरतूद करण्यात यश मिळाले आहे.