Home राजकीय गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा

गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा

0

भंडारा-केंद्र सरकारच्या गॅस दरवाढ व महागाईविरोधात जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढण्यात आली.
सदर अंत्ययात्रा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यालयातून गांधी चौक ते पोस्ट ऑफीस चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यकर्त्याच्या मोठया संख्येने काढण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी भंडारा मार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
गॅसची दरवाढ कमी करावी, पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावे, सुशिक्षित बेरोजगारांना नौकरी व काम उपलब्ध करून द्यावे, पुराचे पाण्यामुळे घरामध्ये पाणी गेल्याने अशा कुटूंबाना प्रति कुटूंब २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी, धान उत्पादक शेतकर्‍यांच्या धानाला तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव देण्यात यावा, ग्रामीण व शहरी भागातील घरकुलसाठी अनुदानात वाढ करण्यात यावी, घरकुलासाठी १0 ब्रास रेती नि:शुल्क देण्यात यावी, धान उत्पादक शेतकर्‍यांना एक हजार रुपये प्रति क्विंटल बोनस देण्यात यावा, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नाना पंचबुद्धे, माजी खासदार मधुकर कुकडे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, सुनंदा मुंडले, रिता हलमारे, जिल्हाध्यक्ष महिला सरिता मदनकर, यशवंत सोनकुसरे, नेहा शेंडे, हेमंत महाकाळकर, अँड. विनयमोहन पशिने, शेखर गभने, प्रा. नारायणसिंग राजपुत, र%माला चेटूले, धनेंद्र तुरकर, आरजु मेर्शाम, अविनाश ब्राम्हणकर, नागेश भगत, ठाकचंद मुंगुसमारे, उमेश ठाकरे, संध्या बोदले, आशिष दलाल, सोनु खोब्रागडे, आहुजा डोंगरे, बेबी आसोले, सुनिता निर्वाण, वंदना खोब्रागडे, किशोर इंगळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version