ईव्हीएम मशीन हद्दपार केल्याशिवाय बहुजनाचे राज्य येणार नाही -वामन मेश्राम

0
10

गडचिरोली: निवडणुकीत वापरली जाणारी ईव्हीएम मशीन ही घोटाळेबाजांची घोटाळी मशीन आहे. ईव्हीएम मशीनद्वारे होणारी हेराफेरी नष्ट झाली पाहीजे. व्होट हमारा, राज तुमारा, नही चलेंगा, असे म्हणित सदर ईव्हीएम मशीन हद्दपार केल्याशिवाय बहुजनाचे राज्य येणार नाही असे प्रतिपादन बामसेफचे नेते वामन मेर्शाम यांनी केले.
भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन महारॅली काढण्यात आली आहे. सदर यात्रा कन्याकुमारी ते काश्मिरपयर्ंत सतत सुरु राहणार आहे. याअंतर्गत स्थानिक इंदिरा गांधी चौक येथे ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शिवनात कुंभारे होते. याप्रसंगी भन्ते सारीपुत, डॉ. गौतम नगराळे, अँड. माया जमदाळे दिल्ली, भारत मुक्ती मोचार्चे गडचिरोली जिल्हा प्रमुख र्जनाधन तांकसाडे, रिपाई नेते प्रा. मुनिश्‍वर बोरकर, विलास निंबोरकर, आनंद गावंडे, भागवत आदींची उपस्थिती होती. आदिवासीईव्हीएम हद्दपार केल्याशिवाय बहूजनांचे राज्य नाही वामन मेर्शाम यांचे प्रतिपादन करत ते पुढे बोलतांना वामन मेर्शाम म्हणाले, या यात्रेमुळेच आज सामाजीक व राजकीय क्षेत्रात काम करणा-या बुद्धीजीवी व राजनैतिक नेत्यांना ईव्हीएम मशीनच्या गडबड घोटाळ्याची माहिती मिळत आहे. कॉंग्रेस आणि भाजपाने केलेले हे पाप मी धुवून काढणार आहे. बहुजनांचे राज्य निर्माण करण्याकरीता ईव्हीएम घोटाळ्याची माहीती देत मी संपूर्ण देश ढवळून काढत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. कुंभारे यांनी बहुजनांच्या अनेक समस्या असून या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडवून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अशोक वंजारी यांनी केले. संचालन भोजराज कान्हेकर यांनी तर आभार प्रमोद राऊत यांनी मानले. भारत मुक्ती मोच्र्याच्या सभेला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते