माजी आमदार अशोक शिंदेंनी संताप व्यक्त करीत काँग्रेसला ठोकला रामराम

0
23

वर्धा : शिवसेना सोडून दीड वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते, माजी आमदार अशोक शिंदे यांनी आज काँग्रेस सोडण्याचा निर्णय जाहीर केला. काँग्रेसची विचारसरणी आदर्श आहे, मात्र नेते नालायक आहे, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

भूमिका मांडताना शिंदे म्हणाले की, पक्षात प्रवेश घेण्यापासून ते आजपर्यंत मला काँग्रेस नेत्यांचा वाईट अनुभव आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यावेळी मला उपाध्यक्षपद देण्याचे कबूल केले होते. त्याचा अद्याप पत्ता नाही. काँग्रेसची सदस्य नोंदणी मजबुतीने केली म्हणून मी प्रदेश समिती सदस्य झालो. मेहरबानी नाही. विविध कार्यक्रम घेतले. कामे केली. पण काँग्रेसची सत्ता असूनही निधी मिळत नव्हता. सुनील केदार, रणजीत कांबळे, चारुलता टोकस व अन्य नेत्यांनी भ्रमनिरास केला. यांना गट मोठा करायचा आहे. पक्षाचा जनाधार नाही. सतत दुसऱ्याचे खच्चीकरण करण्यात यांना आनंद मिळतो. एकाकडे गेलो की दुसरा रुसतो. यांनी जिव्हारी लागणारी वागणूक मला दिली, अशी भावना शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविली.