भाजप सरकारच्या हुकूमशाही विरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे निषेध आंदोलन

0
11

गडचिरोली : केंद्रातील हुकूमशाह बनलेले नरेंद्र मोदी यांच्या नेतृवातील भाजप सरकार सत्तेचा दुरुपयोग करून सरकार विरोधी बोलणाऱ्याना, शेतकरी आणि सर्वसामानन्याचा आवाज उचलणाऱ्या नागरिकांचे व विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.
लोकशाही चे मंदिर असणाऱ्या संसदेतही विरोधकांना बोलू दिल्या जात नाही, खोटे आरोप लावून विरोधकांना सतत बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे, हुकुमशाही वृत्तीच्या भ्रष्ट मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपा ने काँग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने राहुलजींविरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकवण्याचे षडयंत्र रचले आहे. अशाच एका प्रकरणात गुजरात मध्ये राहुलजींना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.याचा निषेध म्हणून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृवात आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जिह्वा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, महिला काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, प्रदेश सचिव भावनाताई वानखेडे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, ओबीसी सेल अध्यक्ष भूपेश कोलते, अनु. जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, गडचिरोली ता. अध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी ता. अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वडसा ता. अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, माजी जि. प. सदस्य कुसुमताई आलाम, माजी नगरसेवक रमेश चौधरी, सुरेश भांडेकर, पांडुरंग घोटेकर, देवेंद्र ब्राम्हणवाडे, राकेश रत्नावार, केसरी पा. उसेंडी, राजाराम ठाकरे, हेमंत मोहितकर, संजय चने, ढिवरू मेश्राम, भैयाजी मुद्दमवार, सुभाष धाईत, रमेश धकाते, भारत येरमे, श्रीमानंद देहारकर, मजीद सय्यद, भूषण नागोसे, अपर्णा खेवले, विद्या कांबळे, प्रफुल आंबोरकर, आय. बी. शेख, अविनाश श्रीरामवार, विशवनाथ राजनहिरे, दत्तात्रय खरवडे, दीपक रामने, अब्दुलभाई पंजवाणी, जितेंद्र मुणघाटे, सुधीर बांबोळे, अरुण पुण्यपरेड्डीवार, चारुदत्त पोहने, सुखदेव वासनिक, मधुकर लोणारे, पराग भोयर, मधुकर मेश्राम, मारोती सदूरवार, जावेद खान, कल्पना नंदेश्वर, वर्षा गुलदेवकर, कविता उसेंडी, मालता कुडो, शरद भजभूजे, पौर्णिमा भडके, आशा मेश्राम सह काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.