राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख सेल/आघाड्यांनी पक्ष मजबुतीकरीता जोमाने कार्य करावे – माजी आमदार राजेंद्र जैन

0
18

गोंदिया-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेचा हितासाठी कार्य करणारा पक्ष आहे. वर्षभर पक्षाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात त्या उपक्रमात सहभागी होवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख शाखेसह सर्व सेल/आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष मजबुती करीता जोमाने कार्य करावे.जनसामान्यांच्या सुख दुःखात सहभागी होवून व समस्या सोडवू तरच सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे अशी भावना जनतेत निर्माण होईल असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.

आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली, कार्यालय गोंदिया येथे जिल्हा व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सेल/आघाडी प्रमुखांची बैठक माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर,नरेश माहेश्वरी, वीरेंद्र जैस्वाल, प्रभाकर दोनोडे,रफिक खान,विशाल शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महीला आघाडी, युवक राष्ट्रवादी काँग्रेस, ओबीसी सेल, डॉक्टर सेल, सेवादल, अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय विभाग, किसान सेल, व्यापारी सेल, अपंग सेल व सर्व सेलचे जिल्हा अध्यक्ष व सेलचे तालुका अध्यक्ष, यांच्या कार्याचा आढावा घेतला व सर्व सेलच्या सक्रिय कार्यकारिणी बनविणे, बूथ कमेटी व पक्ष वाढीकरीता पक्षाच्या वतीने भविष्यातील कार्यक्रमांची रूपरेखा आखून पक्ष मजबुती करीता कार्य करण्याच्या सूचना व मार्गदर्शन केले.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, वीरेंद्र जैस्वाल, प्रभाकर दोनोडे, मनोज डोंगरे, रफिक खान, विशाल शेंडे, टीकाराम मेंढे, मोहन पटले, कमलबापू बहेकार, अशोक शहारे, अखिलेश शेठ, यशवंत परशुरामकर, राजू एन जैन, रवीकुमार पटले, राकेश जैस्वाल, डॉ अजय उमाटे, लोकपाल गहाणे, बाबाभाऊ बहेकार, रामसागर धावळे, कल्पना बहेकार, किरणताई कांबळे, माधुरी नासरे, सुशीला हलमारे, माधुरी पिंपळकर, चित्रलेखा मिश्रा, रजनी गौतम, रिजवाना शेख, ऍड सुनीता जैन, उषा वाडई, आशा पगाडे, जया धावडे, सीमा शेंडे, जयश्री पुंडकर, शोभा गणवीर, डॉ रुखीराम वाडई, किशोर ब्राह्मणकर, उद्धव मेहंदळे, आर. के. जांभुळकर, किरण बन्सोड, नितीन टेम्भरे, पियुष झा, वाय. एस. परशुरामकर, भोजराज राहिले, बबन कुकडे, मुन्नालाल बिनझाडे, तुकडोजी रहांगडाले, राजकुमार प्रतापगडे, संदीप मिश्रा, मामा बन्सोड, प्रमोद लांजेवार, अनिल मानकर, रवी मुदडा, सुजितकुमार अग्रवाल, प्रशांत बालसंवार, सुनील पटले, शैलेश वासनिक, विजय रहांगडाले, करण टेकाम, पंकज चौधरी, अरुण आचले, टी एम पटले, अतुल भांडारकर, नीरज गजभिये, श्याम चौरे, राकेश लंजे, चैत्रराम उके, राजेश तावडे, सुरज भांडारकर, प्रतीक पारधी, भीमराम उके, सदाशिव मेश्राम, रतिराम राणे, योगराज हलमारे, राजेंद्र जांभुळकर, किरण बनसोड, मुकेश पटेल, अब्दुल युनूस शेख, मछिंद्र टेम्भेकर, अरशद खा पठाण, शैय्यद इकबाल, रुपशेन बघेले, कालू चौहान,अजय जांभरें, ओमप्रकाश लांजेवार, आशु पटले, सुरेश चुटे, कुवरलाल बावनथडे, दिलीप डोंगरे, आरजू मेश्राम, सुरेंद्र रहांगडाले, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, कान्हा बघेले, राजेश परिहार, कुंजाम जी, योगी येडे, दर्पण वानखेडे, विक्रमसिंग मानेकर सहित असंख्य पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांच्या अध्यक्षतेत वरिष्ठ नेता नरेश माहेश्वरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्यक विभाग जिल्हाध्यक्ष रफीक खान यांनी अल्पसंख्यक विभाग जिल्हा कार्यकारणी मध्ये महासचिव पदी श्रीमती रिजवाना अहमद (गोंदिया), जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती एड. सुनीता जैन,(गोरेगांव) सचिव पदी अरशद खान(तिरोडा) यांची नियुक्ति केली.