गोंदियात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला कर्नाटक विजयाचा आनंदोत्सव

0
12

गोंदिया,दि.14-येथील शहीद भोला काँग्रेस भवन समोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी कर्नाटक विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाल्याबद्दल भव्य आतिषबाजी करून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत दरम्यान पायी चालत गेलेल्या विधानसभा क्षेत्रामध्ये विशेष यश संपादन केल्यामुळेच काँग्रेसला कर्नाटकमध्ये विजयाचा मार्ग सुकर झाला.जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, यूपीए चेअर पर्सन श्रीमती सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, श्रीमती प्रियंका गांधी तसेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अभिनंदनाचा ठराव सुद्धा एकमताने पारित केला. त्यानंतर शहीद भोला काँग्रेस भवन समोर येऊन कार्यकर्त्यांनी विजय उत्सव साजरा केला. याचा प्रभाव महाराष्ट्रातील राजकारणात सुद्धा पडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले तसेच 2024 मध्ये भाजपाचा प्रभाव अतिशय कमी झालेला दिसेल अशी आशा वाटू लागलेली आहे. यावेळी प्रामुख्याने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप बनसोड, प्रदेश काँग्रेसचे सचिव अमर वराडे,पी.जी.कटरे,सूर्यप्रकाश भगत, श्रीमती वंदनाताई काळे, उषाताई मेंढे, जितेंद्र कटरे,पी.सी.चव्हाण,परवेज बेग, रूपाली उके, दीपक uke, पप्पू पटले, नीलम हलमारे,योगेश अग्रवाल, भरत खापर्डे,प्रदीप सहारे, सीमा लोखंडे, अमर राहुल, विकास शेंडे, मंथन नंदेश्वर, गौरव भिसेन, केदार शरणागत, आम्रपाली कोटांगले, मनीष चव्हाण इत्यादी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.