राष्ट्रवादीचे आमदार चंद्रिकापुरे यांचे पुत्र सुगतसह दोन नगराध्यक्षासह ्अनेकांचा शिवसेनेत प्रवेश!

0
530

गोंदिया दि. 26 मे : अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार क्षेत्राचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सुपुत्र डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांनी सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोर येथील नगराध्यक्ष आणि सदस्यांसह शिवसेना शिंदे गटात 20 ते 25 लोकांनी आज पक्ष प्रवेश केल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे़

सडक अर्जुनी नगरपंचायत मध्ये शिवसेना, काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आहेत.श्भाजप सोडून सर्व पक्षाचे पदाधिकारी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याचे सुगत चंद्रिकापूरे यांनी बेरार टाईम्सला सांगितले.

शिव सेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला आहे. यात सडक अर्जुनी नगर पंचायतचे नगर अध्यक्ष तेजराम मळावी, उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, बांधकाम सभापती अंकित भेंडारकर, माजी बांधकाम सभापती महेंद्र वंजारी, पाणी पुरवठा सभापती साईस्ता मतीन शेख, दीक्षा राजकुमार भगत महिला बाल कल्याण सभापती,माजी नगर अध्यक्ष देवचंद तरोने, माजी नगर अध्यक्ष शसिकला टेंभुर्णे, नगर सेवक गोपीचंद खेडकर, नगर सेवक अशलेस अंबादे, नगर सेवक तायमा जुबेर शेख,नगर सेवक कामिनी कोवे, दिलीप गभने माजी नगसेवक, धनवंत कोवे, विदेश टेंभुर्ने, मतीन शेख अशा 16 लोकांनी पक्ष प्रवेश केला आहे.

तर अर्जुनी मोरगाव नगर पंचायतचे नगर अध्यक्षा आणि बांधकाम सभापती व नगर सेवक अश्या एकूण 5 लोकांनी देखील आज पक्ष प्रवेश केलेआहे. एकंदरीत 21 लोकांनी राष्ट्रवादि पक्षाला रामराम ठोकत शिव सेना शिंदे गटात आज प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे. या पक्ष प्रवेश मध्ये राष्ट्रवादि पक्षाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सुपुत्र डॉक्टर सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांचा समावेश आहे. ते काही दिवसा पूर्वी भाजप च्या वाटेवर होते. मात्र अचानक शिव शेना पक्षात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महापालिका निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच राष्ट्रवादीला जबरदस्त खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादीचे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील  नगराध्यक्षासह नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांच्या अंगावर भगवा शेला टाकत त्यांना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाची गोंदियातील ताकद वाढली आहे. तर राष्ट्रवादीला गोंदियात मोठा फटका बसला आहे. यावेळी महिला कार्यकर्त्याही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दीघे यांच्या नावाने जयघोष केला. या पक्षप्रवेशामुळे गोंदियात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.