आ. कोरोटे यांच्या हस्ते नवीन प्राथमिक आरोग्य केन्द्राचे लोकार्पण

0
13

सालेकसा,ता.०२: तालुक्यातील खेडेपार येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण काल गुरूवार (दि.०१ जून ) रोजी आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी जि.प.सदस्य छाया नागपुरे, खेडेपारचे सरपंच महेश मंगल लिल्हारे, उपसरपंच शंकरलाल चदलाल लिल्हारे,ओमेश्वर शेषराव लिल्हारे, प्रकाश मानदास शहारे, निरु दिलीप गजपुरे, सरिता नरेश बांगरे, संगीता अनिल नागपुरे, मीना भारतलाल शहारे, चंद्रकला संजय शिहोरे,प्रमिला खेमलाल पंधरे,डॉ. अमित खेडीकर , डॉ.राजु रघटार, डॉ.शुभम पारधी यांच्यासह परिसरातील आशावर्कर, कर्मचारी आणि गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.