गोंदिया,दि.11-: नाशिक येथे राष्ट्रीय जिला पंचायत असोसियेशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला.प्रदेशाध्यक्षपदी गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेतर्फे आयोजित पदग्रहण सोहळ्यात पंकज रहांगडाले यांनी जवाबदारी स्विकारली. यावेळी संघटनेचे रामजी जगदाळे, कैलासजी गोरे पाटील, संजूजी वाडे, उदयजी बने, सुभाष घरत, जयमंगल जाधव, विष्णु पाचफुले,विजय झलके आणि सौ.सरिताताई गाखरे प्रामुख्याने उपस्थित होते.प्रदेशाध्यक्ष पदाची जवाबदारी देऊन संघटनेने माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आहे. त्यासाठी संघटनेचे व संचालक मंडळाचे आभार मानतो. सोबतच संघटनेच्या ध्येय आणि धोरणाना अनुसरून कार्य करण्याचे वचन देतो असे सुतोवाच पंकज रहांगडाले यांनी केले.