तिगाव येथील एकशे सत्तर कार्यकर्त्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश

0
4

देवरी, ता.१७ : आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील आमगाव तालुक्यातील तिगाव येथे शनिवार(ता. १६ सप्टेंबर) रोजी तिगाव परिसरातील एकशे सत्तर कार्यकर्त्यांनी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या विकास कार्याशी प्रभावित होऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दिगंबर बोपचे, कुंदाताई शहारे, शिशुकलताई शिवणकर, नीलकंठ मेहर, मुकेश शेंडे, विद्याताई तुरकर, सुखराम पटले, वंदनाताई कोरे, गेंदलाल बारेवार, पुनादास नेवारे, व्यंकट गायधने, निकिताताई पटले, इंद्रराज भगत, गोपीचंद मडावी, खुशाल पटले, गेंदलाल राऊत, चंद्रशेखर बिसेन, मनोहर राऊत,आदित्य हागडे, संदीप बोपचे यांच्या सह एकशे सत्तर कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
या प्रसंगी जि.प. सदस्य उषाताई मेंढे,गांधीटोलाचे उपसरपंच भूमेश्वर मेंढे,संदीप तिराले,सतीश बोपचे,नरेश बोपचे,नेतराम बघेले, कैलास मेश्राम, नमिताताई बघेले,गौतम मेश्राम, हेतराम बोपचे, लोकचंद बिसेन आणि कुणाल शेंडे आदी प्रामुख्याने उपस्थितीत होते. यावेळी आमदार कोरोटे यांनी पक्षात प्रवेश करणा-या सर्व कार्यकर्त्यांना पक्षाचा दुपट्टा घालवून कांग्रेस पक्षात स्वागत केले.