अर्जुनी मोरगाव भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शिवणकरांचा काँग्रेस प्रवेश

0
13
वाढदिवसाच्या शुभेच्छा

अर्जुनी मोरगाव,दि.22ः-येथील पंचायत समितीचे माजी सभापती,गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष अरविंद शिवणकर यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांच्या नेतृत्वात त्यांनी प्रवेश केला.त्यांच्यासोबत डॉ. लोणारे,विनय खोटेले व त्यांच्या सहकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.सतत जनविरोधी निर्णय घेणाऱ्या भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.तालुका काँग्रेस अध्यक्ष घनश्याम धामट,कार्याध्यक्ष प्रमोद पाऊलझगडे,माजी जि.प.अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, नगरसेवक सर्वेश भुतडा,जि.प.सदस्य श्रीकांत घाटबांधे, विजय राठोड, रवींद्र खोटेले,मोरेश्वर सोनवाने,फुलचंद बागडेरिया , संजयभाऊ नाकडे,प्रितमभाऊ रामटेके,तुलाराम खोटेले, व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.