आधी स्वतः मंत्री व्हा; अन् मग दुसऱ्यांबद्दल बोला,विजय वडेट्टीवारांनी आमदार नितेश राणेंना सुनावले!

0
1

चंद्रपुर:– येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार महायुतीचे मंत्री असतील, तशी चर्चा आमच्या महायुतीत सुरू असल्याचे नितेश राणे म्हणाले. जे वारंवार पक्ष बदलतात त्यांनी दुसऱ्यांच्या पक्षनिष्ठेबाबत उगाचच प्रश्नचिन्ह निर्माण करू नये, असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राणेंवर पलटवार केला आहे.

आमदार नितेश राणेंच्या या विधानानंतर कॉंग्रेसच्या गोटात विविध चर्चांना ऊत आलाय. याबाबत (दि. २७) चंद्रपुरात पत्रकारांनी वडेट्टीवारांना विचारले असता ते म्हणाले, आपण काँग्रेसचे एकनिष्ठ शिपाई आहोत. नितेश राणेंनी आधी मंत्री व्हावे, दुसऱ्यांच्या मंत्री होण्याच्या वावड्या उठवू नयेत, असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी नितेश राणेंना दिला.