आम आदमी पक्षाच्या विदर्भ झाडू यात्रेनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात जय्यत तयारी

0
4
राजुरा येथे ११ ऑक्टोबर रोजी होणार समारोप
चंद्रपूर, : आम आदमी पक्षाची विदर्भ झाडू यात्रा 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यात येत आहे. या यात्रेची जिल्ह्यात सर्वत्र उत्सुकता आहे. झाडू यात्रेनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती पक्षाचे वरिष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी दिली.
महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबरपासून सेवाग्राम वर्धा येथून विदर्भ झाडू यात्रेला प्रारंभ झाला. यवतमाळ, वाशिम, बुलढाणा , अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा जिल्ह्यातून ही यात्रा आता चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. १० रोजी सकाळी वरोरा येथील आनंदवन चौकात स्वागत होईल. त्यानंतर हायवेने  रत्नमाला चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि नंदोरी येथे स्वागत होईल.
भद्रावती येथे भव्य स्वागत प्रवेशद्वार लावण्यात येईल. इथे छत्रपती शिवाजी महाराज,  राष्ट्रपिता महात्मा गांधी, नाग मंदिर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे माल्यार्पण करून अभिवादन होणार आहे. दुपारी ही यात्रा चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात प्रवेश करेल. घुग्गस येथील रॅली आटोपून यात्रा चंद्रपूर शहरात येणार आहे. चंद्रपूर येथे जनता कॉलेज चौक येथे भव्य स्वागत होईल आणि मुख्य मार्गाने गिरनार चौकातून गांधी चौकात पोहोचेल. इथे आम आदमी पक्षाचे प्रदेश सहप्रभारी गोपाल ईटालिया यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा होईल.
दुसऱ्या दिवशी 11 ऑक्टोबर रोजी ही यात्रा बल्लारपूरकडे मार्गक्रमन करणार आहे. बल्लारपूर येथे रॅली निघेल. त्यानंतर गडचांदूर येथे पोहोचेल. सायंकाळी राजुरा येथे या यात्रेचा भव्य सांगता सोहळा होणार आहे. राजुरा येथे जिल्हा उपाध्यक्ष सूरज ठाकरे, चंद्रपूर येथे शहर अध्यक्ष योगेश गोखरे, घुघुस येथे अमित बोरकर, बल्लारपूर येथे रवी पप्पुलवार, वरोरा येथे सुरज शहा यांच्या नेतृत्वात तयारी करण्यात आली. या यात्रेच्या माध्यमातून आम आदमी पक्ष चंद्रपूर जिल्ह्यात आपला विस्तार व पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आम आदमी पक्षाचे चंद्रपूर जिल्ह्याचे वरिष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी केले आहे.