गोंदिया,दि.11ः राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस घडामोडी घडत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर अजित पवार गटासोबत राहिलेले माजी खासदार व राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे अध्यक्ष डाॅ.खुशालचंद्र बोपचे यांनी आज 11 आॅक्टोंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची मुबंईत भेट घेत त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.2019 च्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहिलेले युवा नेते रविकांत(गुड््डू )बोपचे यांनी सुध्दा शरद पवार गटात प्रवेश केला आहे.बोपचे पितापुुत्राच्या शरद पवार गटात सहभागामुळे गोंंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना पुन्हा हादरा बसला आहे.काही दिवसापुर्वी सालेकसा तालुक्यातील युवक आघाडीच्या अध्यक्षानेही काँग्रेसमध्ये प्रवेश करुन पटेल गटाला हादरा दिला होता.
बोपचे यांनी मुबंईत शरद पवार गटात प्रवेश केले,त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,आमदार जितेंद्र आव्हाड,आमदार डाॅ.राजेश टोपे यांचीही उपस्थिती होती.