येरंडी /देवल. ग्रामपंचायत वर भाजपा – काँग्रेस समर्पित पॅनलचा दणदणीत विजय

0
10

( सरपंच पदी दीपक कुंभरे विजय )
अर्जुनी मोर. :- ( सुरेंद्रकुमार ठवरे ) तालुक्यात एकमेव निवडणूक झालेल्या येरंडी /देवल. ग्रामपंचायतचा आज लागलेल्या निकालात भाजप- काँग्रेस समर्पित पॅनलचे सरपंचासह दहा ही उमेदवार विजयी झाले असून तिसऱ्या आघाडीला आपले खातेही उघडता आले नाही
संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या तालुक्यातील येरंडी/ देवलगाव ची ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. दरवर्षीच्या निवडणुकीत एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस- भाजपाचे नेते एकत्र आल्याने ही निवडणूक अविरोध होणार असी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र ऐनवेळी तिसरी आघाडी तयार झाल्याने येरंडी ग्रामवासी यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले. मात्र काँग्रेस -भाजप पॅनलची युती निवडणुकीत कायम राहिली नऊ सदस्य व एक सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली .यामध्ये अनिल दहिवले यांचे काँग्रेस पॅनल समर्पित पाच उमेदवार तर लैलेश्वर शिवणकर, वेंकट खोब्रागडे,रत्नदीप दहिवले यांचे भाजप समर्पित पॅनलला सरपंच पदासह पाच उमेदवार असे दहा उमेदवार मिळून निवडणूक लढविण्यात आली. यामध्ये काँग्रेस भाजप पॅनल समर्पित तीन उमेदवार यापूर्वीच अविरोध निवडून आले हे विशेष, उर्वरित सरपंच पद व सहा सदस्यासाठी निवडणूक घेण्यात आली यामध्ये वंचित आघाडी समर्पित तिसऱ्या पॅनल ने ही आपले उमेदवार रिंगणात उतरविले होते. पाच नोव्हेंबरला निवडणूक घेण्यात आली तर 7 नोव्हेंबरला निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये सरपंच गावातून निवडून द्यायचे होते. यावेळी तीन उमेदवार सरपंच पदासाठी मैदानात होते .यामध्ये सरपंच पदासाठी कैलास इस्कापे यांना 431 मते ,दीपक कुंभरे यांना 513 मते, तर घनश्याम पंधरे यांना केवळ 86 मतावर समाधान मानावे लागले. यामध्ये भाजपा समर्पित पॅनलचे दीपक कुंभरे हे सरपंच पदी निवडून आले. तर सदस्यांमध्ये निशिकांत तागडे ,ऐश्वर्य रंगारी ( बिनविरोध ), देवलाबाई कोवे ( बिनविरोध ),सुनील पंधरे, नेमीचंद राऊत, समीक्षा रंगारी, विकास चौरे ,इंदिरा उईके व जिजाबाई बोरकर( अविरोध )हे नऊ सदस्य भाजपा काँग्रेस समर्पित पॅनलचे विजय ठरले. यामध्ये वंचित बहुजन आघाडी समर्पित पॅनलला खातेही उघडता आले नाही भाजपा -काँग्रेस समर्पित पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांसाठी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल दहिवले ,दिलबरभाई रामटेके, बालकदास बोरकर, रत्नदीप मेश्राम ,तर भाजप समर्पित पॅनलचे व्यंकट खोब्रागडे, लैलेश शिवणकर ,रत्नदीप दहीवले, नरेश खोब्रागडे, यादवराव कोवे, भीमराव कुंभरे, योगेंद्र रंगारी, गिरधारी बोरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.