प्रफुल पटेल राज्यसभेसाठी आज अर्ज दाखल करणार

0
8

मुंबई-ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवार, २७ मे रोजी, दुपारी १२ वाजता विधानभवन, मुंबई येथे ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, गटनेते जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.