२६ मे ते १ जून २0१६ पर्यंत रेल्वेचा ‘हमसफर’ सप्ताह

0
11

गोंदिया : भारतीय रेल्वेची आधारभूत संरचनेला विकसित करणे व रेल्वे प्रवाशांच्या उत्तम प्रवासासाठी साफसफाई, खाणपाण व आपसी संवाद साधून सोशल मीडियाद्वारे प्रवाशांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न करण्यात आले. रेल्वे प्रवाशांनी याचा व्यापक उपयोग केला व रेल्वेने उचललेल्या पाऊलावर आपला विश्‍वास व्यक्त केला. हीच परंपरा आता रेल्वे मंत्रालयाद्वारे २६ मे ते १ जून २0१६ पर्यंत ‘रेल्वे हमसफर सप्ताह’ म्हणून आयोजित करण्यात आला आहे. 
या दरम्यान २६ मे ते १ जून या सातही दिवशी विविध विभागाशी संबंधित मुद्दय़ांचे निरीक्षण करताना मोठय़ा स्तरावर दरदिवसी स्वच्छता दिवस, सत्कार दिवस, सेवा दिवस, सतर्कता दिवस, सामंजस्य दिवस, सहयोग दिवस, संचार दिवस म्हणून सात दिवस सात मोहिमा चालविण्यात येतील. रेल्वे हमसफर सप्ताहात प्रत्येक झोनल रेल्वेद्वारे १0 नवीन प्रवासी सुविधांची सुरूवात करण्यात येणार आहे. 
याच माळेत रेल्वे हमसफर सप्ताहाच्या पहिल्या दिवसी २६ मे रोजी स्वच्छता दिवस साजरा करण्यात येत आहे. याच दिवसी झोनमधील तिन्ही मंडळात सर्व स्थानकांमध्ये सघन स्वच्छता अभियान राबविण्यात येईल. ज्या मंडळात सर्व स्थानकांवर नामित अधिकार्‍यांच्या नेतृत्वात अभियान राबविण्यात येईल. यात रेल्वे कर्मचारी, अधिकारी, स्काऊट गाईड व एनजीओ संघटनेचे कर्मचारी सहभागी होतील.
२७ मे रोजी सत्कार दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. यात मंडळातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रवासी सुविधांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या खाणपाणच्या सोयी व शीतल पेयजलाची उपलब्धता तसेच खाणपाणाशी संबंधित बाबींची सघन तपासणी करण्यात येईल. त्यातच पॅन्ट्रीकारचे निरीक्षण करण्यात येईल. दरम्यान खाणपाणाचे स्तर व गुणवत्तेची सतत तपासणी व रेल्वे लिस्टला डिस्प्ले करण्यावर भर देण्यात येणार आहे. 
२८ मे रोजी सेवा दिवस साजरा करण्यात येणार आहे. यात रेल्वे झोन व मंडळाचे अधिकारी नामित चालत्या गाडीत रेल्वे प्रवाशांकडून देण्यात येणार्‍या प्रवाशी सुविधांबाबत सल्ला व विचार घेण्यात येतील. त्यासह सोशल मीडियाच्या माध्यमातून सल्ले घेण्यात येतील व तक्रारींचे त्वरित निवारण करण्यात येईल. 
२९ मे रोजी सतर्कता दिवस साजरा करण्यात येईल. सघन तिकीट तपासणी अभियान राबविण्यात येईल. या दरम्यान वाणिज्य विभाग, सतर्कता विभाग, आरपीएफ जवानांद्वारे सघन तिकीट तपासणी अभियान राबविताना तिकीटधारी प्रवासी व इतर रेल्वे प्रवाशांना नियमांशी संबंधित माहिती दिली जाईल. ३0 मे रोजी सामंजस्य दिवस साजरा करण्यात येईल.यात झोनल व सर्व मंडळ मुख्यालयाशी संबंधित अधिकार्‍यांद्वारे कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी व वरिष्ठ कर्मचार्‍यांसह रेल्वे आवास कॉलनींचे निरीक्षण करण्यात येईल.