ठाणे विधानपरिषद निवडणूकीत महायुतीचे रवींद्र फाटक विजयी

0
8

ठाणे, दि. ६ – ठाणे विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार रविंद्र फाटक विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा पराभव केला आहे. १९९२ पासून सलग चारवेळा विधानपरिषदेवर निवडून गेलेले वसंत डावखरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले होते.