देवरी येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

0
13

देवरी तालुका शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तर्फे कार्यक्रमाचे आयोजन.

देवरी,दि.२४: शिवसेना पक्षप्रमुख हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठकरे यांची ९८वी जन्म जयंती मंगळवार (दि.२३ जानेवारी) रोजी देवरी तालुका शिवसेना (उद्धव ठाकरे गट) च्या वतीने.तालुका प्रमुख सुनील मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली देवरी येथील दंडकारण्य निवासी दिव्यांग (अस्थी) विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिठाई व शैक्षणिक साहित्य वाटप करून मोठ्या उत्साहात साजरी केली.
याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक ए.पी. लांजेवार, पी. कापगते, टि.मेश्राम व मरसकोल्हे बाई आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे देवरी तालुका प्रमुख सुनील मिश्रा, देवरी शहर प्रमुख राजा भाटिया, उप तालुका प्रमुख सुहाग गिरी, उपशहरप्रमुख महेश फुन्ने , शिवसैनिक अजय गिरी, अमित शाहू, विक्की गिरी,मयंक गिरी, गोलू गिरी,यस गिरी,सुमित गिरी, जयेश ब्राह्मणकर,आकाश दखने, अरुण कापगते यांच्यासह शिवसैनिक व विद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.