जलपातळी वाढविण्यासाठी पाणी जिरवणे गरजेचे- आम. कोरोटे

0
4

■ककोडी येथे आमदार कोरोटे यांच्या हस्ते मामा तलावाचे भूमिपूजन

 देवरी,दि.०८: देश सुजलाम सुफलाम करायचे असेल, तर शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. ग्रामीण भागात जल पातळी वाढवायची असल्यास पाणी जिरविण्याच्या योजना रुजविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन  आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचेआमदार सहसराम कोरोटे यांनी केले.
ते काल बुधवारी मौजा ककोडी येथे मृद व जलसंधारण विभागांतर्गत मामा तलावाचे कालवा दुरुस्ती करिता मंजूर ५३ लाख रूपये निधीच्या कामाचे भूमिपूजन करतानी बोलत होते.
याप्रसंगी जि.प.सदस्य उषा शहारे, माजी जि.प.सदस्य राजू चांदेवार, ककोडीचे सरपंच मीना मडावी, वरिष्ठ कांग्रेस कार्यकर्ता चैनसिंग मडावी, भैय्यालाल जांभूळकर, अमरदास सोनबोईर, बब्बलू भाटिया,निलेश शाहू, राजु अंबादे यांच्यासह ककोडी क्षेत्रातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावकरी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.