गोंदिया,दि.10-स्व.मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनकर, राज्यपाल रमेश बैस,उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्या रविवारला गोंदिया शहरात आगमन होत आहे.त्यातच अलीकडच्या काळात महाराष्ट्रात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून महाराष्ट्र उत्तरप्रदेश आणि बिहारसारखा होण्याची स्थिती निर्माण झाल्याने राज्यसरकारचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात काळे झेंडे दाखविण्याची घोषणा युवक काँग्रेसने केली होती.त्या घोषणेची दखल पोलीस प्रशासनाने घेत गोंदिया जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजकुमार (बाबा) बागडे यांना ताब्यात घेत नजरकैदेत ठेवले आहे.आम्ही राहुल गांधीजींचे सैनिक आहोत आणि भ्याड सरकारच्या या कृतीला आम्ही घाबरत नाही, असे राजकुमार (बाबा) बागडे यांनी म्हटले आहे.
जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष राजकुमार (बाबा) बागडे पोलिसांच्या नजरकैदेत
वाढदिवसाच्या शुभेच्छा