गोंदिया,दि.13- एनएसयूआई महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमिर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसयूआई गोंदिया जिल्हाध्यक्ष अमन तिगाला यांनी कार्यकर्त्यांसह एनएसयूआई तर्फे राबविण्यात येत असलेल्या अन्यायाविरुद्धच्या “जय जवान न्याययुद्ध कार्यक्रमाच्या” पोस्टरचे प्रकाशन काँग्रेस कार्यालयात करण्यात आले.
NSUI जिल्हाध्यक्ष अमन तिगाला म्हणाले की, या मोहिमेत आमची मागणी आहे की 2019 – 2022 या कालावधीत भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलात निवड झालेल्या सर्व 1.5 लाख तरुणांना कोणताही विलंब न करता तात्काळ सामील करून सैन्यात कायमस्वरूपी भरती करावी. प्रक्रिया पुनर्संचयित केली पाहिजे. “अग्निपथ” योजना तात्काळ रद्द करून, सर्व उपस्थित अग्निवीरांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात यावी. NSUI गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात “अग्नवीर” योजनेच्या विरोधात आंदोलन करेल.या प्रसंगी विविध महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी NSUI चे सदस्यत्व घेतले तसेच अनेक अधिकाऱ्यांना नियुक्ती पदांचे वाटप केले.कार्यक्रमास गोंदिया तालुका काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष रमेश अंबुले व कृषी उत्पन्न बाजार समिती गोंदियाचे उपसभापती राजकुमार पप्पू पटले यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी कृष्णा बिभार, राहुल बावनथडे, सुमित शेंडे, अमन रोगटिया, जुनेद पठाण, सुमित महाजन, रेहान शेख, शुभम ओगले, मारूफ सिद्दीकी, क्रिश खोब्रागडे, जाकीर खान, अभिलाष सोनवणे, मयंक महाजन, शंकर चोरणे, जीत गौतम, कलश चोरण .सह इतर अधिकारी उपस्थित होते.