राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने नेत्र‌ तपासणी, चष्म्यांचे वाटप व भोजन दान

0
14
धाराशिव दि.17- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने नेत्र तपासणी, चष्मा वाटप व स्वाधार मतिमंद आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन दान दि.१६ फेब्रुवारी रोजी देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्र तपासणी करून रुग्णांवर उपचार करण्यात आले. तर तपासणी केलेल्यांना ड्रॉप व चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच आळणी शिवारातील स्वाधार मतिमंद आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन दान देण्यात आले. यावेळी कळंब धाराशिव विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, शहराध्यक्ष सचिन तावडे, शहर उपाध्यक्ष आशिष पाटील, युवक कार्याध्यक्ष मनोज जगताप, शहर सचिव सुजित बारकुल, सुहास मेटे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.