अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपची नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर

0
2

अमरावती : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश होणार आहे.
अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना भाजपच्या तिकिटावर रिंगणात उतरविण्याची घोषणा केली आहे. उल्लेखनीय आहे की, गेल्या आठवडाभरापासून नवनीत राणा यांना उमेदवारी बाबत साशंकता निर्माण झाली होती. अखेर आज शिक्कामोर्तब झालं असून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र प्रकरण अद्याप सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, कोणत्याही दिवशी निर्णय येऊ शकतो. एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची शयता वर्तवली जात आहे. आज उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निवडणुकीपूर्वी येईल असे वाटत नाही. दरम्यान, नवनीत राणा आज रात्री ५० गाड्यांच्या ताफ्यासह नागपुरकरीता रवाना झाले आहे. त्या चंद्रशेखर बावनकुडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.यावेळी अमरावती जिल्ह्यातील नेत्यांनाही उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये प्रविण पोटे, खासदार डॉ. अनिल बोंडे हे सुद्धा नागपूरला रवाना झाल्याचे सांगितल्या जात आहे.
दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाकडून नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांचे समर्थक, पक्षाचे पदाधिकारी आणि आमदार रवी राणा आणि सुनील राणा यांनी त्यांच्या शंकर नगर येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. राजकमल चौकातही हा आनंद आणि आनंदाचा क्रम सुरूच होता. राणा समर्थकांनी राजकमल चौकात बराच वेळ फटाके फोडले.