मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार-एकनाथ खडसे

0
6

जळगाव :राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आता पुन्हा स्वगृही भाजपात प्रवेश करणार आहेत. खडसे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीवारी केल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर त्यांनी आपले भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत चांगले संबंध असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या सातत्याने चर्चा सुरु होत्या. या चर्चांनंतर आज अखेर एकनाथ खडसे यांनी या चर्चांवर मोठा खुलासा केला आहे. मी भाजपात प्रवेश करणार आहे, अशी कबुली एकनाथ खडसे यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत भावनिक वक्तव्य केलं. मी शरद पवार यांचा  ऋणी राहीन. त्यांनी मला संकटकाळात मदत केली. येत्या 15 दिवसात दिल्लीत भाजपात प्रवेश करणार, असं एकनाथ खडसे म्हणाले.

भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मी भेट घेतली. भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. येत्या 15 दिवसांच्या आत हा प्रवेश व्हावा, अशा स्वरुपाचा माझा प्रयत्न आहे. चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही. माझा भाजपप्रवेश हा दिल्लीला होणार आहे. दिल्लीला केंद्रीय नेतृत्वाकडून मला ज्यादिवशी बोलवणं येईल त्याचदिवशी माझा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल”, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.