गोंदिया : शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांची व्हिडिओ क्लिप एडिटिंग करून त्यांच्या प्रतिमेला मलीन करण्याचे काम अज्ञात व्यक्तीकडून करण्यात येत आहे. याकरिता शिवसेना शहर अध्यक्ष राजेश कनोजिया यांच्या नेतृत्वात गोंदिया शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुर्यवंशी यांना शिवसेनेच्या प्रतिनिधी मंडळ द्वारा निवेदन देण्यात आले. निवेदनात त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सुनिल लांजेवार, उपजिल्हा प्रमुख तेजराम मोरघडे, उपजिल्हा संघटक अशोक आरखेल, युवासेना जिल्हाध्यक्ष हरिश तुळसकर, तालुका समन्वयक संजू समशेरे, अल्पसंख्यक उपाध्यक्ष शहारुख पठाण, कार्यालय सचिव माही बंजारे आदी उपस्थित होते.