सांगलीत बंडखोर विशाल पाटील यांची विजयी मोहोर

0
24
वाढदिवसाच्या शुभेच्छा

सांगली-पूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला  आज सुरुवात झाली. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सध्या आघाडीवर आहे.अशात सांगली लोकसभा मतदार संघातून मोठी बातमी समोर आली आहे. सांगली येथे अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटील यांचा पराभव केलाय.

सांगली लोकसभेसाठी यंदा जवळपास 61 टक्के मतदान झालं. त्यामध्ये खरी लढत ही अपक्ष विशाल पाटील आणि भाजपचे संजयकाका पाटील यांच्यात झाली.विशाल पाटील यांनी कॉँग्रेससोबत बंडखोरी अपक्ष अर्ज भरला होता.आता त्यांनी थेट विजयावर आपलं नाव कोरलं आहे. विशाल पाटील यांना 4 लाख 29 हजार 947 मते पडली आहेत. तर, संजयकाका पाटील यांना 3 लाख 50 हजार 300 मते मिळाली आहे.

सांगलीत महाविकास आघाडीने विशाल पाटील (Vishal Patil) यांना उमेदवारी द्यावी, असा स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र, ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याने चंद्रहार पाटील यांना रिंगणात उतरवले गेले. यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता.

शिवसेना ठाकरे गट आणि भाजपचा पराभव

अशात जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी चंद्रहार पाटलांना मदत न करता अपक्ष असलेल्या विशाल पाटलांना मदत केल्याचं आता उघड झालं आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपामध्ये सांगली ही जागा सर्वाधिक वादाची ठरली होती. शिवसेना ठाकरे गटाने परस्पर या जागेवर चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केली आणि त्यानंतर प्रचंड वाद झाला होता. शिवसेनेला याचा चांगलाच फटका बसला आहे. येथे अपक्ष विशाल पाटील यांनी विजयावर मोहोर लावली आहे.