महाराष्ट्राचा पहिला निकाल हाती, नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी

0
111

नंदुरबार-जिल्हा पहिल्यापासून काँगेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.  यंदा हा गड काँग्रेसने राखला असून काँग्रेस के. सी. पाडवी यांचे पुत्र अॅड. गोवाल पाडवी (Goval Padvi) यांचा विजय झाला आहे.भाजपच्या महायुतीची उमेदवार डॉ. हीना गावित काँग्रेस आणि के. सी. पाडवी यांचे पुत्र अॅड. गोवाल पाडवी (Goval Padvi) यांच्यात थेट लढत झाली. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा पारंपारिक काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2014 च्या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसच्या बालेकिल्लाला खिंडार पाडत नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर आपला झेंडा फडकवला होता. यंदा या मतदारसंघात मतदानच्या टक्केवारीत देखील वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा नेमका काँग्रेसला झाला आहे.
नंदुरबारमध्ये (Nandurbar Lok Sabha) एकूण 70.68 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा नंदुरबारमध्ये 2.68 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2019 मध्ये नंदुरबारमध्ये 68 टक्के मतदान झाले होते. हिना गावित आणि विरुद्ध गोवाल पाडवींमध्ये यांच्यातील लढत ही अटीतटीची आहे. भाजपाने काँग्रेसच्या बालेकिल्लाला खिंडार पाडत नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर आपला झेंडा फडकवला होता. भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचा पराभव केला होता.

कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान? एकूण मतदान – 70.98 टक्के

अक्कलकुवा – 75.01 टक्के
शहादा – 71.49 टक्के
नंदुरबार – 66.67 टक्के
नवापूर – 80.18 टक्के
साक्री – 67.60
शिरपूर – 65.05
कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?
नंदुरबार लोकसभा मतदार संघाचा विचार केल्यास या मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातील चार तर धुळे जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघाचा यामध्ये समावेश आहे.

अक्कलकुवा – के. सी. पाडवी
शहादा – राजेश पडवी
नंदुरबार – विजयकुमार गावित
नवापूर – शिरीषकुमार नाईक
साक्री- मंजुला गावित
शिरपूर – काशीराम पावरा

2019 सालचा निवडणूक निकाल –

डॉ. हीना गावित – 6 लाख 37 हजार 226 (विजयी)
अॅड. केसी पाडवी – 5 लाख 41 हजार 930 (पराभूत)
मताधिक्य – 95,296
1951 पासून 2014 पर्यंत या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला आहे. तर 2014च्या निवडणुकीत पहिल्यांदाच कमळ उमललं होतं. या यशाची पुनरावृत्ती 2019 साली डॉ. हिना गावित यांनी केली होती. हीना गावित सलग दुसर्‍यांदा भाजपकडून या मतदारसंघात खासदार बनल्या आहेत. यावेळी त्यांची हॅट्रिक मात्र हुकली.