गोंदिया,दि.०७ :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया विभाग प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष दिलीप बन्सोड यांच्या शिफारसीवर नागरत्न छत्रपती बन्सोड यांची गोंदिया जिल्हा काँग्रेस सोशल मिडीया विभागाच्या जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती केली आहे. नियुक्ती पत्र गोंदिया भंडारा मतदारसंंघाचे खासदार डाॅ.प्रशांत पडोळे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी गोंदिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड,प्रदेश सचिव अमर वराडे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक गप्पू गुप्ता, गोंदिया शहराध्यक्ष ऍड योगेश अग्रवाल बापू,युवक कांग्रेस जिल्हाध्यक्ष राजकुमार बागड़े,ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र कटरे,विधी व न्याय विभाग के जिलाध्यक्ष ऍड टी.बी.कटरे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती पप्पू पटले,कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक राजीव ठकरेले, अरुण गजभिये, जिल्हामहासचिव नीलम हलमारे, योगी भेलावे आदी उपस्थित होते,या सर्वांनी बनसोड यांचे अभिनंदन केले.