अर्जुनी मोर : नवेगाव बांध येथे अपूर्वा कृष्णा बोरकर या तरुणीचा भाड्याने राहत असलेल्या घरात विद्युत शॉक लागून मृत्यू झाला.सकाळी तरुणी पाणी गरम करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. तिने पाणी गरम करण्यासाठी हीटर सुरू केला. यातच त्या हिटरचा करंट लागून खाली पडली. आरडा ओरड करून आजूबाजूच्यांना बोलाविले व तिला ग्रामीण रुग्णालय नवेगाव बांध येथे हलविण्यात आले.
डॉक्टरांनी तिच्यावरती उपचार करण्याचा प्रयत्न केला त्याआधीच तिची ज्योत मावळलेली होती. या संबंधीची तक्रार नवेगाव बांध पोलीस स्टेशनला करण्यात आली. चौकशी करूनतरुणीचे छव उत्तर तपासणीनंतर पोस्टमार्टम करिता पाठवीण्यातआले मात्र तरुणीच्या आई वडीलानीत्याला विरोध करून व तिच्या मृत्यूवर आक्षेप घेऊन सदर प्रेत फॉरंशीक चाचणी करीता गोंदिया येथे पाठवण्यात आले.
सदर तरुणी नवेगाव बांधा वरून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढरवाणी रैय्यत येथे पोस्ट मास्तर या पदावर गेल्या सहा-सात महिन्यापासून काम करीत होती.तिचा पती किष्णा सह दोघे राहतं होते. एकमेकांवरती प्रेम असल्याने गेल्या तीन महिन्यापुर्वी यांच्यात प्रेम संबंध घडन आले. त्यांनी प्रेम विवाह केला होता .ज्या ठिकाणी भाड्याने राहत होते सदर प्रकरण हा भाड्याच्या घरात घडल्याने घराची चौकशी झालेली नाही.सदर प्रकरणाचे तपास नवेगाव बांध येथील पोलीस उपनिरीक्षक अमोल भोसले, पोलीस उपनिरीक्षक ओमचंद दुनेदार, पो.न. गौरीशंकर कोरे करीत आहेत.