तिरोडा : राष्ट्रवादी काँग्रेसतर्पेâ लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा हे उद्देश ठेवून ९ ऑगस्टपासून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. सामाजिक न्यायासाठी, महाराष्ट्राची अस्मिता व स्वाभिमानासाठी निघालेली शिवस्वराज्य यात्रा ३५ विधानसभा मतदारसंघाचा टप्पा गाठत अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करित तिरोडा- गोरेगाव मतदारसंघात १० सप्टेंबर रोजी दुपारी १२.०० वाजता प्रवेश करणार आहे. या यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी युवानेते रविकांत बोपचे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार तिरोडा- गोरेगाव विधानसभा च्या वतीने करण्यात आली असून या यात्रेचा भव्यदिव्य कार्यक्रम ड्रीम गार्डन लॉन, तिरोडा येथे संपन्न होणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्पेâ लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा या बॅनरखाली स्वराज्याच्या रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशिर्वादाने पावनभूमी शिवनेरी किल्ला येथून प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खा.सुप्रियाताई सुळे, खा.डॉ.अमोल कोल्हे, माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख, आमदार राजेश टोपे, आ.रोहित पवार यांच्या नेतृत्वात निघालेली शिवस्वराज्य यात्रा संपूर्ण महाराष्ट्र भर प्रवास करणार आहे.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचारांचा स्वाभिमानी महाराष्ट्र घडविण्यासाठी, सामाजिक न्याय हक्क प्रस्थापित करण्यासाठी, महाराष्ट्राची अस्मिता व अस्तित्व कायम अबाधित राखण्यासाठी, पक्षफोडया गद्दारांना धडा शिकविण्यासाठी, महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी, महिलांची सुरक्षा व कल्याणासाठी, सुशिक्षित बेरोजगारांना न्याय देण्यासाठी आणि रयतेच्या मनातील शिवस्वराज्य प्रस्थापित करण्यासाठी तिरोडा- गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील स्वाभिमानी शिलेदारांनी या भव्यदिव्य शिवस्वराज्य यात्रेत सहभागी व्हावे, असे आव्हान युवा नेते रविकांत बोपचे यांनी व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तिरोडा- गोरेगाव विधानसभा क्षेत्राच्या वतीने करण्यात आलले आहे.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष राघवेंद्र बैस, तालुकाध्यक्ष होमराज अंबुले, ओमप्रकाश रहांगडसाले, भाग्यश्री केळवतकर, रविंद्र वंजारी, रविकुमार कुर्वे, मिनाक्षी हिरापुरे, खेमराज पटले, जॉनी सैय्यद, धामसिंग बघेले, अकबर शेख, छाया टेकाम, मंदाताई टेंभरे यांच्यासह राकॉ शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारला तिरोड्यात
वाढदिवसाच्या शुभेच्छा