आरक्षण बचाव जनसंवाद यात्रेचे ३० सप्टेंबरला अर्जुनी मोरगांव येथे समारोपीय कार्यक्रम

0
33

अर्जुनी मोरगांव: वंचित बहुजन आघाडी जी भूमिका मांडत आहे ती गावो गावी जायला हवी या उद्देशाने ॲड.बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने या सामाजिक संघटनांना घेऊन २५ जुलै पासून दादर चैत्यभूमी येथून आरक्षण बचाव जनसंवाद यात्रेची सुरूवात करण्यात आली.अर्जुनी मोर विधानसभा – ६३ क्षेत्रांच्या विविध जिल्हा परिषद क्षेत्रातील गावोगावी जाऊन ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे विशेष महत्त्व कळायला हवे या उद्देशाने दिनांक ३० सप्टेंबर २०२४ ला दुपारी २ वा. ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे समारोपीय कार्यक्रम वात्सल्य सभागृह अर्जुनी मोरगांव येथे आयोजित करण्यात आले आहे.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री तथा वं.ब.आघाडी अध्यक्ष पूर्व विदर्भ रमेश गजबे, जिल्हा प्रभारी वं.ब.आघाडी गोंदिया भगवान भोंडे, समन्वयक वं.ब.आघाडी पूर्व विदर्भ मुरलीधर मेश्राम, समन्वयक वं.ब.आघाडी पूर्व विदर्भ विवेक हाडके, निरीक्षिक वं.ब.म.आघाडी गोंदिया सुनिता टेंभूर्णे, जिल्हाध्याक्ष वं.ब.आघाडी सतीश बंन्सोड, समन्वयक वं.ब.आघाडी पूर्व विदर्भ अरविंद सांदेकर,प्रफुल्ल माणके, जिल्हाध्यक्ष वं.ब.म.आघाडी गोंदिया किरण फुले, जिल्हाध्यक्ष वं.ब.यु.आघाडी अश्विन डोंगरे,ॲड.सानिया डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष प्यारेलाल जांभुळकर, जिल्हा महासचिव राजु राहुलकर, गोंदिया शहर अध्यक्ष विनोद मेश्राम तसेच अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील वंचित बहुजन आघाडीचे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सदर कार्यक्रमाकरीता अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व प्रामुख्याने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.