सडक अर्जुनी: वंचित बहुजन आघाडी आरक्षण बचाव जाहीर सभेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी द्वारे दि.२२ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता वंचित बहुजन आघाडी तर्फे सडक अर्जुनी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत. तरी जास्तीत जास्त संख्येने जनतेने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रा.सतीश बन्सोड यांनी केले आहे.