आमदार रोहीत पवार यांची मुंडीकोटा,दवनीवाड,तिरोडा व गोरेगाव येथे जाहिर सभा

0
211
गोंदिया,दि.११ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तरुण तडफदार नेते आणि आमदार रोहीत पवार यांची महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविकांत भाऊ (गुड्डू) बोपचे यांच्या प्रचारार्थ तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन १३ नोव्हेंबरला करण्यात आले आहे. १३ नोव्हेबंंरला मुंडीकोटा बाजार चौक जयश्री हॉटेल समोर
दुपारी १२:३० वाजता,दवनीवाडा : बाजार चौक,येथे सायं ३:३० वाजता, तिरोडा: जुनी नगरपरिषद मैदान येथे
सायं ५:०० वाजता आणि गोरेगाव येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रचार कार्यालय, हिरापूर रोडच्या मागे रात्रि ७:०० वाजता प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेला तिरोडा तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश टेंभरे,गोंदिया तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश अंबुले,गोरेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष जगदिश येरोला,भाकप नेते हौसलाल रहागंडाले,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष सौरभ रोकडे,रिपाई नेते,आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष,शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाअध्यक्षांनी जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.