दयाशंकर सिंह अनौरस अपत्य- उषा चौधरी

0
12

लखनौ (वृत्तसंस्था) – बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींवर टीका करताना अपशब्द वापरणारे दयाशंकर सिंह हे अनौरस अपत्य असल्याची टीका बहुजन समाज पक्षाच्या आमदार उषा चौधरी यांनी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना चौधरी म्हणाल्या, “जेव्हापासून भाजप सत्तेत आला आहे तेव्हापासून दलितांचा छळ वाढला आहे. जे लोक तुरूंगात हवेत त्यांना भाजप पाठिशी घालत आहे. दयाशंकर सिंह मायावतींबद्दल जे बोलले आहेत, ते कदाचित त्यांच्या कुटुंबियांबाबत लागू असेल. त्यांच्या डीएनएमध्ये काहीतरी गडबड आहे. मला वाटते ते अनौरस अपत्य असावेत. त्यामुळेच त्यांनी अशा शब्दांचा वापर केला.‘ तसेच दयाशंकर सिंह यांनी देशाचा आणि भारतीय राज्यघटनेचे जनक बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचेही चौधरी पुढे म्हणाल्या.

देशातील दलित मला देवी मानतात: मायावती
“देशभरातील दलित आणि आर्थिकदृष्ट्या मागास समाजाकडून मला “बेहनजी‘ असे संबोधले जाते. ते माझ्याकडे देवी म्हणून पाहतात. त्यांच्या भावनांचा मी आदर करते. जर देवी आणि देवांबद्दल कोणी अपशब्द काढले तर नागरिकांच्या भावना दुखावणार. त्यामुळे ते त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत‘, अशा शब्दांत बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्या पुढे म्हणाल्या, “”दयाशंकर सिंहने जी व्यक्ती बहुजन समाज पक्षाची प्रमुख आहे, राज्याची (उत्तर प्रदेश) चार वेळा मुख्यमंत्री होती आणि ज्या व्यक्तीचा समाजातील कमकुवत गटाकडून प्रचंड आदर करण्यात येतो अशा व्यक्तीसाठी अपशब्दांचा वापर केला आहे.‘ तसेच “त्यामुळे अशा व्यक्तीबद्दल अपशब्दांचा वापर केल्याने लोकांच्या भावना दुखावल्या असून ते आपल्या रागवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत‘, असेही मायावती पुढे म्हणाल्या.