अर्जुनी मोर.पं.स.सभापतीपदी राकाँच्या आम्रपाली डोंगरवार तर उपसभापती पदावर भाजपचे संदिप कापगते

0
940

अर्जुनी मोर.दि.२०ः-अर्जुनी मोरगाव पंचायत समिती सभापती पदाकरीता आज २० जानेवारीला झालेल्या निवडणूकीत गोठणगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडून आलेल्या आम्रपाली डोंगरवार या एकमेव अनुसूचित जाती महिला सदस्य असल्याने त्यांची निवड सभापती पदाकरीता निवड बिनविरोध झाली आहे.सभापती पदाचे आरक्षण हे अनुसूचित जाती महिलाकरीता राखीव असल्याने श्रीमती डोंगरवार यांच्या गळ्यात माळ पडली आहे.उपसभापती पदाकरीता भारतीय जनता पक्षाचे संदिप कापगते निवडून आले.

अर्जुनी मोरगाव पंचायत समितीमध्ये 14 सदस्य असून यामध्ये वंचित एक, भाजपा सात, राष्ट्रवादी काँग्रेस दोन, काँग्रेस चार, असे पक्षीय बलाबल आहे.