हार-तुरे नको, दुष्काळग्रस्तांना मदत करा; राज्यमंत्री राठोड

0
9

यवतमाळ : राज्यमंत्री संजय राठोड यांनी आपल्या सत्कार सोहळ्यातून दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभा केला आहे. राठोड यवतमाळ जिल्हातील दिग्रस मतदारसंघाचे शिवसेना आमदार आहेत. त्यांचा राज्यमंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित केला.

पण, राज्यातील दुष्काळग्रस्त स्थिती पाहता, राठोड यांनी हार-तुरे, शाल याऐवजी त्यासाठी येणारा खर्च थेट दान करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. आपल्या सत्कारासाठी येताना कुठलाही खर्च करू नये असे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी जनतेला केलं. स्वागत आणि सत्कारासाठी येताना हार, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ किंवा मिठाई असं काहीही न आणता, त्यासाठी लागणारे पैसे राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यासाठी दान द्या, असं आवाहन राठोड यांनी केलं.मंत्र्यांच्या या आवाहनाला मग जनतेनं देखील मोठा प्रतिसाद दिला. सत्काराला येताना प्रत्येकानं कार्यक्रमस्थळी ठेवलेल्या दानपेटील खर्चाचे पैसे टाकले आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला.