
गोंदिया,दि.१०ः- जिल्हा परिषदेच्या आज १० जानेवारीला होऊ घातलेल्या निवडणूकीत भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसला दूर करीत सभापती पदाकरीता ४ उमेदवार रिंगणात उतरवले.यात डॉ लक्ष्मण भगत ,पोर्णिमा ढेंगे,दिपा चंद्रिकापूरे व रजनी कुंभरे यांचा समावेश आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने नेहा केतन तुरकर,किरण पारधी व जगदिश बावनथडे यांनीही आपले अर्ज दाखल केले आहेत.या निवडणूकीत मात्र भाजपने भंडारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने भाजपशी केलेला दगाफटका लक्षात घेत एकही सभापती पद न देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे ३२ मते घेत भाजपचे सर्व उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.काँग्रेसच्यावतीने सुध्दा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून उमेदवारी मागे घेण्याच्या वेळेपर्यंत काय खलबते होतात याकडे लक्ष लागले आहे.