औद्योगिक सुरक्षितता विषयावर बैठक व कार्यशाळा आयोजित

0
14

भंडारा, दि. 10 : भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात औद्योगिक सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक  आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, भंडारा डॉ. संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या निर्देशानुसार ही बैठक दि. 13 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे होणार आहे.

भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यां जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनेवर कार्यरत घटकांना सुरक्षिते विषयक माहिती या कार्यशाळेमध्ये देण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यात साधारणता 167 औद्योगिक कारखाने कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर औद्योगिक सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक घेतली जात आहे. बैठकीदरम्यान औद्योगिक परिसरातील सुरक्षितता, अपघात प्रतिबंधक उपाय, कामगारांचे आरोग्य आणि औद्योगिक धोके यावर सखोल चर्चा होणार आहे.

सदर बैठकीस पोलीस अधिक्षक, नुरूल हसन भंडारा तसेच अपर संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, नागपूर विभाग, नागपूर हे उपस्थित राहणार आहेत तसेच सुरक्षा अधिकारी, कामगार अधिकारी आणि भोगवटादार व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत. यासोबतच विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकाऱ्यांनाही बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी दिल्या आहेत.

औद्योगिक क्षेत्रात सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्यामुळे कारखान्यांमधील सुरक्षा मानकांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.