मुख्यमंत्री फडणवीस पाठोपाठ खा.पटेल सहकुटुंब कुंभमेळ्यात

0
402

गोंदिया,दि.१६: गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल  सहकुटुंब कुंभ स्नानासाठी शनिवारी प्रयागराजला गेले. प्रयाग राजांमध्ये सध्या कुंभमेळा सूरू आहे. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकुटुंब प्रयागराजला गेले होते. तेथे त्यांनी कुंभ स्नान केले. त्यापाठोपाठ खासदार प्रफुल पटेल व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या सर्व कुटुंबासह प्रयाग राजांमध्ये दाखल झाले.