आ.विजय रहांगडाले याच्या हस्ते अदिती बैसचा सत्कार

0
68

तिरोडा:- तिरोडा निवासी कु.अदिती संजयसिंह बैस यांनी विधी पदवीमध्ये ७ वेगवेगळे सुवर्णपदक प्राप्त करून तिरोडा शहराचा मान उंचावल्याबद्दल तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांचा शाल आणि श्रीफळ देवून गौरव करण्यात आला.यामध्ये प्रामुख्याने बँच प्रथम, मुलींमधून प्रथम,न्याय शास्त्र, मालमता कायदा,नागरी प्रक्रिया संहिता, पुराव्याचा कायदा, बौद्धिक संपदा हक्क या विषयामध्ये उच्च प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल राष्ट्रीय विधी विद्यापीठतर्फे दीक्षांत समारंभात सुवर्ण पदक बहाल करण्यात आले यावेळी प्रामुख्याने कृउबास सभापती जितेंद्र रहांगडाले, एँड अजय यादव, एँड प्रणय भांडारकर, मोहन ग्यानचंदानी पालक संजय बैस, ज्योतीदेवी बैस,व कार्यकर्ते उपस्थित होते.