भाजपात प्रवेश करणा-यांना योग्य मानसन्मान व न्याय मिळेल:- डाॅ.परिणय फुके

0
75

= डॉ.राहुल ठवरे कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल

अर्जुनी-मोर.-भारतीय जनता पक्ष हा नेहमीच विकासाचा राजकारण करीत असून या क्षेत्रातील शेतकरी कामगार वंचितांना न्याय देत आहे.डॉ. राहुल ठवरे यांचे काम अत्यंत कौतुकास्पद असून ते पक्षात आल्याने अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात विशेषता गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रात भाजप अधिक मजबूत झाला आहे. त्यांचे व त्यांच्यासह पक्षात दाखल झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांना योग्य मानसन्मान व न्याय मिळेल असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनी केले.
तालुक्यातील नवेगावबांध येथील बाजार समीतीच्या प्रांगणात( ता.5) भाजपा पक्ष कार्यकर्ता मेळावा व भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रमात डाॅ.परिणय फुके बोलत होते. मंचावर भंडारा-गोंदिया भाजपा संघटन मंत्री वीरेंद्र अंजनकर, अर्जुनी मोर. तालुका भाजपा अध्यक्ष विजय कापगते, सडक अर्जुनी तालुका भाजपा अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, जिल्हा महामंत्री नाजूक कुंभरे, महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा ढेंगे, सडक अर्जुनी पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, ज्येष्ठ नेते केवळराम पुस्तोळे, जि. प. सदस्य रचनाताई गहाणे, जयश्री देशमुख, माजी सभापती उमाकांत ढेंगे, डॉ. राहुल ठवरे, जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी, चंद्रकला डोंगरवार, विजयाताई कापगते, लुनकरण चितलांगे, माजी सभापती प्रकाश गहाणे, अशोक लंजे,होमराज पुस्तोळे, चामेश्वर गहाणे,प्रशांत शहारे, हर्ष मोदी, शालिंदर कापगते, राजेश कठाने,भोजु लोगडे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

भंडारा गोंदिया जिल्ह्याचे संघटन मंत्री बाळा अंजनकर यांनी मार्गदर्शन करताना भाजप कार्यकर्त्यांना विशेषतः या पक्षप्रवेश सोहळ्यापासून नाराज असलेल्याना ईशारा देत भाजप हा कुण्या एकाचा पक्ष नसून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठा झालेला पक्ष आहे. आलेल्यांचा स्वागत करून जुना व नवीन कार्यकर्ता सगळ्यांना समान न्याय देणे हेच भाजपचे हित आहे कारण भाजप हा लोकशाही तत्त्वावर चालणारा पक्ष आहे असा थेट ईशाराच दिला.तर जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर ानी भारतीय जनता पक्षाला भारतीय जनताच पक्ष हरवतो इतरांमध्ये हरवण्याची क्षमता सध्या तरी नाही. दोन्ही निवडणुकांमध्ये आपल्याच कार्यकर्त्यांनी आपल्याला दगा दिला.परत पक्षाने मला काय दिले असा प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र ज्यांना असं भ्रम असेल त्यांनी पक्षाच्या चिन्हाशिवाय लढून दाखवावं असे आव्हान दिले. डॉ.राहुल ठवरे नव्या दमाचा युवा कार्यकर्ता आहे त्यांचा पक्षासाठी चांगला फायदा होईल असेही मत व्यक्त केले.प्रास्ताविक विजय कापगते यांनी केले.