गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाची युती

0
154

गोंदिया,दि.२९ःगोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून २८ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षानी युती करीत सहकार पॅनलच्या नावाने निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.विशेष म्हणजे २८ मे रोजी च्या अंकात बेरार टाईम्सने दोन्ही पक्ष एकत्र येत युती करुन निवडणूक लढणार असे वृत्त प्रकाशित केले होते,त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.या युतीची घोषणा भाजपा जिलाध्यक्षा सौ. सीताताई रहांगडाले व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले,आमदार विजय रहांगडाले,आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार भेरसिंग नागपुरे व भाजपचे संघटन सचिव बाळा अंजनकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.महायुतीच्या वतीने सहकार पॅनल या नावानी बँकेची नवडणूक लढविली जाणार असून पॅनलचे संयोजक म्हणून आमदार परिणय फुके,आमदार विनोद अग्रवाल,आमदार विजय रहांगडाले,आमदार राजूकमर बडोले,माजी आमदार राजेंद्र जैन,आमदार संजय पुराम राहतील अशी घोषणा यावेळी करण्यात आली. या सभेला विनोद अग्रवाल,विजय रहांगडाले,बाळाभाऊ अंजनकर,राजेंद्र जैन,भेरसिंग नागपुरे, हेमंत पटले,लायकराम भेंडारकर, खोमेशभाऊ रहांगडाले,विजय शिवणकर,झामसिंग येरणे,रचनाताई गहाणे,पंकज रहांगडाले, ऍड येशुलाला उपराडे,राजू.एन.जैन यांच्यासह अन्य उपस्थित होते.