
१६ वरिष्ठ उपाध्यक्ष, ३८ उपाध्यक्ष, १०८ सरचिटणीस व ९५ सचिव
नवी दिल्ली: काँग्रेसने मंगळवारी महाराष्ट्रासाठी राजकीय व्यवहार समिती (पीएसी) स्थापन करण्याबरोबरच अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या नवगठीत पीएसीमध्ये प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
यात कार्यकारी समितीमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमिन पटेल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे,डॉ. विजय दर्डा आदींचा समावेश आहे.
काँग्रेसने महाराष्ट्रासाठी १६ वरिष्ठ उपाध्यक्ष, ३८ उपाध्यक्ष, १०८ सरचिटणीस व ९५ सचिव व अन्य अनेक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
पक्षाने ८७ सदस्यीय कार्यकारिणीची स्थापना केली आहे. काँग्रेसने याबरोबरच कर्नाटकात आपल्या निवडणूक अभियान समितीसाठी अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. ज्येष्ठ नेते एल. हनुमनथैया यांना या समितीचे सह अध्यक्ष नियुक्त केले आहे.
जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या
नवी मुंबई – पूनम मिथुन पाटील, धुळे शहर -साबीर शेख, धुळे ग्रामीण – प्रवीण बापू चौरे, अहिल्यानगर शहर – दीप चव्हाण, सातारा -रणजित देशमुख, सोलापूर ग्रामीण – शतगर सतलिंग अण्णाराव, हिंगोली- सुरेश सराफ, लातूर ग्रामीण – अभय साळुंखे, दक्षिण रत्नागिरी – नरोद्दीन सय्यद, उत्तर रत्नागिरी -सोनललक्ष्मी वीरधवल घाग, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण – किरण पाटील डोणगावकर, नांदेड उत्तर – राजेश पावडे, नागपुर ग्रामीण – अश्विन दिलीप बैस.





