29.6 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home राजकीय पदाधिकारींनी आपापल्या जबाबदाऱ्या भक्कमपणे पार पाडाव्या-भाजयुमो जिलाध्यक्ष रोहित अग्रवाल

पदाधिकारींनी आपापल्या जबाबदाऱ्या भक्कमपणे पार पाडाव्या-भाजयुमो जिलाध्यक्ष रोहित अग्रवाल

0
40

गोंदिया। भारतीय जनता पक्षाची युवा इकाई प्रत्येक गावातील प्रत्येक बूथ स्तरापर्यंत पोहोचणे हे आमचे ध्येय आहे. गाव पातळीवर कार्यकारिणी स्थापन करणे, गावच्या समस्या मांडून त्यांचे निराकरण करणे हाच आमचा दायित्व आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ सर्व समाजातील नागरिकांपर्यंत अधिकाधिक प्रमाणात पोहोचावा यासाठी युवा मोर्चा पूर्ण ताकदीने कार्यरत असल्याचे भाजयुमो जिलाध्यक्ष रोहित अग्रवाल म्हणाले.ते भारतीय जनता युवा मोर्चा गोंदिया च्यावतीने आमगाव–सालेकसा तालुक्याची बैठक रविवार, 18 जानेवारी रोजी आमगाव येथील लक्ष्मणराव मानकर फार्मसी महाविद्यालयात पार पडली,त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीत संघटन मजबूत करणे, प्रदेश नेतृत्वाकडून मिळालेल्या कार्यक्रमांना यशस्वीपणे पूर्ण करणे तसेच आमगाव, सालेकसा तालुक्यात पक्षाला बळकटी देणे आणि युवकांना जबाबदाऱ्या देणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी युवामोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना भाजयुमो जिलाध्यक्ष रोहित अग्रवाल यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना क्षेत्राचे आमदार संजय पुराम म्हणाले – भारतीय जनता पक्ष आज एक भक्कम संघटन आहे. पक्षाची खरी ताकद आपले युवक आहेत. हे युवा मोर्चेच पक्षाचा कणा आहेत. भाजयुमो जिलाध्यक्ष रोहित अग्रवाल यांच्या कुशल नेतृत्वाखाली युवकांना मिळालेल्या जबाबदाऱ्यांमध्ये सर्वांनी संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने कार्य केले पाहिजे.

भंडारा–गोंदिया जिल्हा समन्वयक विरेंद्र अंजनकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पक्षाची रीती-नीती आणि केंद्रातील भाजपा सरकारची कामगिरी यांचा अधिकाधिक प्रसार करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकांना जोडण्याचे काम करावे. क्षेत्रीय समस्या जोरकसपणे मांडाव्यात; आम्ही जनप्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांचे निराकरण करू.

या बैठकीत आमदार संजय पुराम, भाजयुमो जिलाध्यक्ष रोहित अग्रवाल, भंडारा–गोंदिया जिल्हा समन्वयक विरेंद्र अंजनकर, विजय शिवनकर, अॅड. येशुलाल उपराडे, भेरसिंगभाऊ नागपुरे, नरेंद्र वाजपेयी, अॅड. राजेश हरिनखेड़े, मनोज सोमवंशी, देवराम चुटे, दुर्गेश गौतम, रोहित गुप्ता, निलेश उपराडे, मनोज बोपचे, संतोष कटरे, पुष्पराज जनबंधू, सोमेश उपवंशी, सुनंदाताई उके, सुष्माताई भुजाडे, मधुताई अग्रवाल, शुभमचंद अग्रवाल, राजू पटले, घनश्याम अग्रवाल, उमेश रहांगडाले, संदीप थानथराटे, विकास महारवाडे, इंद्रजीत भाटिया तसेच अनेक भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

blank