41.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home राजकीय चिट्ठीतून नव्हे तर संघटन सृजन अभियानातून निवडला जाणार काँग्रेसचा नवा जिल्हाध्यक्ष

चिट्ठीतून नव्हे तर संघटन सृजन अभियानातून निवडला जाणार काँग्रेसचा नवा जिल्हाध्यक्ष

0
202

blank

सृजन अभियानाच्या गोंदिया व भंडारा जिल्हा पर्यवेक्षक श्रीमती सविता बेनीवाल यांची पत्रपरिषदेत माहिती

गोंदिया,दि.२७ः काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून ‘संघटन सृजन अभियान’ या नव्या उपक्रमाची सुरुवात केली. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी जिल्हा काँग्रेस समित्यांना सक्षम करणे आणि उत्तरदायित्व आधारित यंत्रणा उभारणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे संघटन सृजन अभियानाच्या गोंदिया व भंडारा जिल्हा पर्यवेक्षक श्रीमती सविता बेनीवाल यांनी सांगितले.गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षाची निवड प्रकिया व पदाधिकारी,कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याकरीता तीन दिवसीय दौर्यावर त्यांचे आज गोंदियात आगमन झाले.त्यावेळी त्या येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत(दि.२७)होत्या.त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व संघटन सृजन अभियान प्रभारी यांचे समन्वयक प्रविण दरेकर,गोंदिया जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार दिलीप बनसोड उपस्थित होते.

हे अभियान स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी आणि काँग्रेसची पकड अधिक मजबूत करण्यासाठी राबवले जात आहे.पंचायत पातळीपर्यंत काँग्रेस संघटना बळकट करणे हा मुख्य उद्देश असल्याचे श्रीमती बेनीवाल म्हणाल्या.काही दिवसांपूर्वीच अखिल काँग्रेस पक्षाचे 84वे अधिवेशन गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडले.त्या अधिवेशनात  ‘संघटन सृजन अभियान’ सुरु करण्याची घोषणा केली होती.त्यानुसार हे अभियान काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.”सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासोबतच कार्यक्षम कार्यकर्त्याला संधी देणे आणि चिट्टीतून पदाधिकारी निवडण्यावर आळा घालण्याकरीता हे अभियान चालविण्यात येत असल्याचे सांगितले.गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाकरीता येत्या १९ एप्रिलपर्यंत अर्ज मागविण्यात आले असून २१ एप्रिलला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे अहवाल सोपवला जाईल.आलेल्या अर्जावर एआयसीसीचे पदाधिकारी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचेही श्रीमती बेनीवाल यांनी सांगितले.