नोटाबंदीमुळे आराजकतेची स्थिती – प्रफुल्ल पटेल

0
10

गोंदिया,दि.13-कसल्याही प्रकारचे नियोजन न करता आणि नागरिकांना कसल्याही प्रकारची सूचना न देता केंद्र शासनाने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या. गरज असताना आणि बॅंकेत पैसे असताना देखील बॅंँकेतून स्वत:चे पैसे काढता येत नाही. सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि नोकरदारवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. संपूर्ण देशात अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार ्रपफुल्ल पटेल यांनी केले.
येथील श्रीगुर्जर क्षत्रीय समाजवाडी येथे सोमवारी ( राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्हास्तरीय सभा पार पडली. या सभेत कार्यकर्ते आणि पक्षाच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटा बंदीच्या निर्णयामुळे अनेकांच्या घरी आयोजित कार्यक्रम रद्द करावे लागले. अनेक जण सकाळपासून एटीएम आणि बॅंकेसमोर रांगेत लागतात. यात त्यांचा वेळ वाया जातो. अशा अवस्थेत देखील ज्यावेळी त्यांचा नंबर लागतो, त्यावेळी बॅंकेतील आणि एटीएममधील पैसे संपले असल्याचे सांगीतले. स्वत:चे पैसे बॅंकेत असताना त्यांना लग्नकार्य, औषधोपचार प्रभावित झाले. शासनाच्या या धोरणामुळे देश अराजकतेच्या वाटेवरून जात आहे.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिरोडा आणि गोंदिया नगर पालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होत आहे. त्याकरिता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. नागरिकांनी देखील नागरिकांच्या विरोधात निर्णय घेणार्‍या भाजपला जागा दाखवावी,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. राजेंद्र जैन यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले. याप्रसंगी दिलीप बनसोड, नरेश माहेश्‍वरी, राजलक्ष्मी तुरकर, दामोदर अ्रगवाल, शिव शर्मा, विजय शिवणकर, आशा पाटील, प्रेम रहांगडाले, पंचम बिसेन, अशोक शहारे, केतन तुरकर, ममता बैस, छोटू पटले, उषा किंदरले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.