सभापतींच्या निवडीत भाजपला राकाची साथ

0
15

राष्ट्रवादीचे रगडे स्थायी समितीवर : पानतवनेंना बांधकाम सभापतीपद
गोंदिया दि.१८ : गोंदिया नगर पालिकेच्या विषय समिती सभापतीपदाकरिता(ता.१७) विशेष सभा बोलावण्यात आली. या सभेत विषय समिती सभापतींची निवड करण्यात आली. निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंगÑेसने भारतीय जनता पक्षाला साथ दिली. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादी कॉंगÑेसचे नगरसेवक विजयरगडे यांना स्थायी समिती सदस्यपदी घेतले. आज पार पडलेल्या निवडणुकीत बांधकाम सभापतीपदी घनशाम पानतवने, शिक्षण समिती सभापतीपदी भावना कदम, नियोजन समितीवर मैथूला बिसेन,महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी श्रीमती मेश्राम आणि पाणी पुरवठा सभापती म्हणून दिलीप गोपलानी यांची वर्णी लागली. उल्लेखनीय म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून पालिकेत गळ्याला गळा मिळवून असलेल्या शिवसेनेने मात्र भाजपला नाकारून कॉंगÑेसला साथ दिली.
गोंदिया नगर पालिकेत भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा इतिहास रचला. नगराध्यक्षपदी या पक्षाचे अशोक इंगळे यांची निवड शहरातील जनतेने केली. गत आठवड्यात पार पडलेल्या विशेष सभेत उपाध्यक्षपदी भाजपचे शिव शर्मा यांची वर्णी लागली. आज अध्यक्षांच्या परवाणगीने विषय समित्यांच्या निवडणुकीकरिता विशेष सभा पाचारण करण्यात आली होती. या सभेत विषय समिती सभापती निवडीचा पÑस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर विरोधी पक्ष असल्यामुळे मतदानाने सभापती निवडीची पÑकÑीया सुरू करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंगÑेसच्या नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपच्या सदस्यांची संख्या अधीक झाली. या मोबदल्यात भारतीय जनता पक्षाने एकही स्वीकृत सदस्य निवडून न आलेल्या राष्ट्रवादी कॉंगÑेसच्या विजय रगडे यांना स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड केली. पार पडलेल्या स्थायी समिती सभापतीपदावर बांधकाम समिती सभापती म्हणून घनशाम पानतवने, शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून भावना कदम, नियोजन समिती सभापती म्हणून मैथूला बिसेन, महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून श्रीमती मेश्राम यांची, तर पाणी पुरवठा समिती सभापतीपदी दिलीप गोपलानी यांची निवड झाली. उल्लेखनीय म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून पालिकेत भारतीय जनता पक्षाला शिवसेनेने साथ दिली. परंतु,. पहिल्यांदाच शिवसेनेच्या नगरसेवकांनी कॉंगÑेसच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे शहरात एकच चर्चा सुरू झाली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात जागा वाटपावरून बिनसली. त्यामुळेच याठिकाणी देखील सेनेने भाजपला साथ न देण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा आहे.