विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांचे निधन

0
19

यवतमाळ, दि. 18 – वेगळ्या विदर्भाचे कट्टर पुरस्कर्ते आणि माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांचे आज (शनिवार) निधन झाले. धोटे यांना मध्यरात्री 1 वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान पहाटे 3 वाजता प्राणज्योत मालवली. जांबूवंतराव धोटे यांच्या पार्थिवावर दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.जांबुवंतराव धोटेंच्या निधनाने विदर्भावर शोककळा पसरली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांसोबतच इतर प्रश्नही धोटेंनी आक्रमकपणे मांडले. त्यामुळे त्यांना ‘विदर्भवीर’ असेही संबोधले जात होते.

जांबुवंतराव धोटे यांनी 2002 साली त्यांनी विदर्भ जनता काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.
महाराष्ट्राच्या विधानसभेवर 5 वेळा तर लोकसभेवर दोन वेळा निवडून आले होते.
विदर्भ राज्य निर्मितीच्या आंदोलनातील सच्चा नेता हरपला- सुधीर मुनगंटीवार
विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाने विदर्भ राज्य निर्मितीच्या आंदोलनातील सच्चा नेता हरपला असल्याची भावना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्ती केली आहे.

मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य म्हणून त्यांनी केलेली कामगिरी बघता त्यांच्यातील कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आपल्याला ठळकपणे दिसतो. वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीच्या आंदोलनात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी सतत संघर्घ केला. सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखाशी समरस होत त्यांनी नेहमीच निर्धाराने निक्षून त्यांची बाजु जनतेच्या दरबारात, विधिमंडळात, संसदेत मांडली. एक सर्जनशील कलावंत त्यांच्यात दडला होता. अशा या थोर बह